
जगभरातील सर्व क्रिकेट रसिकांचा लाडका गिली आत्मचरीत्र लिहुन निदान भारतीयांच्या मनातुन तरी उतरतोय. कारण? अर्थातच क्रिकेट मधील देवावर सचिन तेंडुलकरवर त्याने सोडलेले टिकास्त्र! गिलीने सचिनवर दोन आरोप उपस्थित केले आहेत. १) सचिन खोटारडा आहे (भज्जी प्रकरणात खोटी साक्ष) २) सचिन घमेंडी खेळाडू आहे. पैकी दुसर्या आरोपाता काहीच तथ्य नाही. क्रिकेट मध्ये घमेंड (करत असेल तर) करण्याचे निर्विवाद लायसन्स सचिनला आहे. एकहाती जॉ माणूस इतिहास घडवू शकतो त्याच्या बाबतीत घमंड वगैरे शब्द अस्तित्वात नाहीत, आहे तो नुसता इतरांचा जळफळाट!
असो.. पण त्याच वेळेला गिलीच्या पहिल्या आरोपात मात्र मला तथ्य वाटते. भज्जीचे आतापर्यंतचे एकूणच वर्तन बघता त्याने सिमंड्सला मैदानावर वांशीक शिवीगाळ केली हे नक्की! काही फुटांवर असणार्या सचिनने ते ऐकले हे ही नक्की! आपण जर खरी साक्ष दिली तर (आपला मित्र) भज्जीची कारकिर्द संपृष्टात येईल ह्या भीतीने सचिनने साक्ष फिरवली.
काहींच्या मते सचिनचे हे मित्रप्रेम असेल,एक उत्तम खेळाडू संघातुन हाकलला जाऊ नये ही संघवृत्ती असेल आणि त्यामूळे केलेले वर्तन बरोबर वाटत असेल. परंतु हे प्रकरणा हाताळताना सचिनने जे काही केले तो अप्रामाणिकपणाच. समजा उद्या रिकी पाँटींग किंवा एखाद्या गोर्या खेळाडूने भारतीय खेळाडूंना उद्देशुन वांशीक शेरेबाजी केली आणि त्याला वाचवायला त्यांच्याच संघातील दुसर्या एखाद्या खेळाडूने त्याची पाठराखण केली तर आपली प्रतिक्रिया काय असेल? आणि तीच प्रतिकिया जर आता इतर देशातील खेळाडूंची सचिन विषयी असेल तर मलातरी त्यात काही गैर वाटत नाही.
1 comments:
मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!
दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!
आपला,
अनिरुद्ध देवधर
Post a Comment