लोकशाहीवर पद्धतीवर नेहमी होत असलेली टीका म्हणजे 'बहुमताला अक्कल नसते' हा (बहुतांशी लोकांचा?) समज. ह्या निवडणुकीत समोरा समोर उभे ठाकले आहेत ओबामा/बायडन आणि मकेन/पेलीन. ओबामा एकिकडे आपल्या वादविवाद आणि संभाषण कौशल्यातुन हार्वर्ड सारख्या विद्यापिठातुन घेतलेले शिक्षण सार्थ ठरवतो आहे तर दुसर्या बाजुला सेराह पेलिन बाई आपली बौद्धीक दिवाळखोरी ह्या ना त्या कारणाने प्रसार माध्यमांसमोर मांडत आहेत. त्यांचे यू ट्यूब वरील मुलाखतीवरील बरेचसे तुकडे पाहुन मला तरी काही महिन्यांपूर्वी नेटवर (अति)प्रसिद्ध झालेल्या मिस टीन साउथ कॅरोलायनाची आठवण होते.
आता चार नोव्हेंबरला पाहुया बहुमत विजयाची माला सभाचतुर ओबामाला  घालते, की महान पेलीन बाईंना सोबत घेउन लढणार्या मकेनला. लोकशाहीची खरी कसोटी आहे खरी!
तोपर्यंता पहा व्हिडिओ : सेराह पेलीन ह्यांचे अमेरिकेतील प्रमुख वर्तमान पत्रांविषयीचे ज्ञान.
0 comments:
Post a Comment